मुलगी वाचवा
बालिका दिन विशेष मातृदेवो भव । असा संस्कार घडवणारी आपली महान संस्कृती. स्त्री हाच जीवसृष्टीचा मूलाधार आहे अशी संत महात्म्यांची स्वीकृती स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही काव्यप्रकृती स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटणे ही प्रभू रामचंद्रांची प्रवृत्ती शिवबा विनोबा आणि बापूजी हे मानवश्रेष्ठ ही यशाचे श्रेय मातेला देती. बापूजी म्हणतात ,' एक माता ही सहस्त्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे , ही माता काय नाही करत ? अनेक भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे , निःस्वार्थीपणे , आपुलकीने , वात्सल्याने पार पाडते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच असते. ती वेगवेगळ्या रूपाने आपली कर्तव्ये बजावत असते. आई होऊन नयनांचा दिवा आणि तळहाताचा पाळणा करून लेकरांना सांभाळते. त्याच्या कुसुमकोमल मनावर संस्कार घडवते. जिजाऊ होऊन शिवबासारखे थोर राष्ट्रपुरुष घडविते. हिरकणी होऊन बाळासाठी प्राणाची बाजी लावते. लतादीदींसारखी बहीण होऊन भावंडांच्या ...