प्रदूषण मुक्त दिवाळी
प्रदूषण मुक्त दिवाळी फटाके मुक्त दिवाळीचे पत्रक विद्यार्थ्यांना वाटून खुर्चीत बसलो . फटाके मुक्त दिवाळी च्या पत्रकामध्ये विद्यार्थ्यांनी फटाके खरेदी मध्ये किती रुपयांची बचत करेन याची नोंद करण्याची आवश्यकता होती . समोरच्या बेंचवरील मुलगा त्याच्या मित्राला म्हणाला ,' मी या वर्षी फक्त ५ हजार रुपयांचे फाटके वाजविणार '. त्याचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले . मुलांचे आई वडील फटाके खरेदी करताना इतका खर्च करतात हे त्यावेळी मला ...